बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी पक्ष अन्य पक्षांशी युती न करता येणाऱ्या सर्व शहरी स्थानिक स्वराज्य संस्था लढवणार असल्याचे सांगितले.
शिवकुमार यांनी पक्ष आपल्या चिन्हावर उमेदवार उभे करेल. आता येणाऱ्या निवडणुकांसाठी वेळापत्रक निश्चित केले गेले आहे. दरम्यान नागरी संस्थांसाठी सर्व जागा लढवणार आहे, असे ते म्हणाले.
कॉंग्रेस याआधी स्थानिक पातळीवर युती करून निवडणूक लढवत असत. बर्याच ठिकाणी आपले स्वतःचे उमेदवार उभे केले जायचे नाहीत. पण यापुढे पक्षच्या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवू. आम्ही जिंकू किंवा नाही हा नंतरचा भाग आहे, असे ते म्हणाले.