ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मागील 24 तासात 2.17 लाख पेक्षा अधिक नवे आढळून आले आहेत. त्यातच आता काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझी कोरोनाची चाचणी आज सकाळी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. त्यामुळे मागील काही दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वतः ची चाचणी करून घ्यावी आणि खबरदारी घ्यावी, असे आवाहनही केले आहे.









