ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. या बैठकीत पक्षाने अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत मोठा निर्णय घेतला. जून महिन्याच्या 23 तारखेला काँग्रेस अध्यक्षाची निवड केली जाणार आहे.
सध्या काँग्रेसचे हंगामी अध्यक्षपद सोनिया गांधी यांच्याकडे आहे. काँग्रेसच्या 23 नेत्यांनी गांधी घराण्याला थेट आव्हान दिल्याने अध्यक्षपदाची निवडणूक अटळ होती. त्यामुळे आज झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुहूर्त ठरला.
या बैठकीत देशातील कोरोना सद्यस्थिती, तसेच चार राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणूकांच्या निकालावर चर्चा करून पुढील रणनितीही ठरवण्यात आली.









