मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्रात स्वबळाचा नारा देत आहेत. नाना पटोले यांच्या स्वबळाच्या सुरात भाई जगताप यांच्यानंतर आता संजय निरुपम यांनी देखील सूर मिसळला आहे. काँग्रेसला जर स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर शिवसेनेला किंवा शिवसेना पक्षप्रमुखांना मिरच्या का झोंबतात?, अशा सवाल काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी विचारला आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय निरुपम म्हणाले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या एकला चलो रे या घोषणेवर मी सहमत आहे. कॉँग्रेसला संपवण्यासाठी किंवा सतत तिसऱ्या क्रमांकावर ठेवण्यासाठी जाणूनबुजून प्रयत्न केला जातो. पण मला वाटतं काँग्रेसने स्वबळावर लढायला पाहिजे. जर काँग्रेस स्वबळावर लढत असेल, तशी इच्छा असेल तर शिवसेनेला, किंवा त्यांच्या प्रक्षप्रमुखांना मिरची झोंबायचे कारण नाही, असं निरुपम म्हणाले.
राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष असलेल्या महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र, गेले काही दिवस नाना पटोले पुढील निवडणुका स्वबळावर लढण्याचा सूर आळवला आहे. त्यांना काही काँग्रेस नेते साथ देत आहेत, तर काही नेते मात्र स्वबळाच्या नाऱ्यामुळे नाराज आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. सरकारमध्ये काँग्रेसचे जवळपास डझनभर मंत्री असूनही स्वबळाची भाषा कशाला, अशी भावना राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आहे. या सगळ्या प्रकरणावर बोलताना निरुपम यांनी शिवसेनेचा समाचार घेतला.
Previous Articleसांगली : क्रांतीस्मृतीवनातील वृक्षांना लावणार “बारकोड” ; सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजीचा पुढाकार
Next Article अखेर सर्वोदय कॉलनीतील घरांवर फिरविला जेसीबी








