- काँग्रेसच्या 8 आमदारांचा भाजपमध्ये आज प्रवेश ?
ऑनलाईन टीम / इंफाळ :
संसदेच्या पावसाळी अधिवेशनात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. मणिपूर प्रदेश काँग्रेस कमिटीचे (एमपीसीसी) अध्यक्ष गोविंददास कोंथौजम यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, राज्यातील काँग्रेसचे 8 आमदार आज भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का बसला आहे.
गोविंददास कोंथौजम हे काँग्रेसकडून बिष्णुपर विधानसभा क्षेत्रामधून सलग सहा वेळा आमदार झाले आहेत. तर विधानसभेत नेता प्रतीपक्ष देखील होते. मागील वर्षी डिसेंबरमध्ये त्यांना मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या महिन्यात भाजपने शारदा देवी यांना मणिपूरमध्ये पक्षाचे अध्यक्ष केले होते. टिकेंद्र सिंह यांच्या जागी त्यांची निवड करण्यात आली होती. टिकेंद्र सिंह यांचे मे महिन्यात कोरोनाने निधन झाले त्यानंतर ही नियुक्त करण्यात आली आहे.









