ऑनलाईन टीम/तरुण भारत
ईशान्येकडील मेघालय राज्यात टीएमसीनं काँग्रेसला पुन्हा धक्का दिलाय. उत्तर गारो हिल्स जिल्ह्यातील आदिवासी परिषदेचे 11 काँग्रेस सदस्य तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळं या परिषदेत काँग्रेसऐवजी टीएमसी आता प्रमुख विरोधी पक्ष म्हणून समोर आलाय. इतकंच नाही, तर काँग्रेसकडं केवळ 11 सदस्य होते आणि आता त्या सदस्यांनी पक्षाची साथ सोडल्याने काँग्रेसची सदस्य संख्या शून्यावर आलीय.









