मुंबई \ ऑनलाईन टीम
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी आज, शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. भेटी मागचं नेमकं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालं नाही आहे. पण काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आमच्यात अंतर्गत कुरबुरी नाही, आम्ही एकत्र पद्धतीने काम करत असल्याचे स्पष्ट केले आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, नितीन राऊत यांच्या भेटीचं कारण त्यांना विचारलं पाहिजे. परंतु ते देशातील एका सेलचे प्रमुख आहेत. आमचे मंत्री आहेत, काहीना काही तरी चर्चा त्यांना करायच्या असतील. सोनिया गांधी आमच्या नेत्या आणि अध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचे जे प्रश्न असतील, काही चर्चा करायच्या असतील, त्यासाठी ते भेटले असतील. तसेच आमच्यात अंतर्गत कुरबुरी नाही. आम्ही एकत्र पद्धतीने काम करत आहोत. कार्यकारणी लवकरच जाहीर होईल, असे सांगत त्यांनी आमच्याच अंतर्गत वाद नसल्याचे स्पष्ट केले.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत प्रश्न विचारला असता बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, त्यासंबंधित आमची चर्चा दिल्लीत येऊनच होत असते असं नाही. फोनवरून सुद्धा चर्चा होते. एकंदर कोरोनाचं संकट संपलं नाही. तसेच किती सदस्य कोरोनाबाधित आहेत नाही हे समजन कठीण असतं. टेस्ट ७२ तासांमध्ये पुन्हा घ्यावी लागते. या सगळ्या अडचणी होतात. अध्यक्षपदाच्या प्रक्रियेला चार दिवस हवे असतात. एवढ्या दिवसांमध्ये पुन्हा एकदा टेस्ट घेणे. तसेच अजूनही काही सदस्य आहेत, ज्यांच्या प्रकृतीच्या समस्या आहेत. अशा काळामध्ये निवडणुकीला सामोर जाणे योग्य नाही.
Previous Articleजम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या 7 जागा वाढणार
Next Article पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा यांचे निधन








