ऑनलाईन टीम/तरुण भारत
काँग्रेसमधील (congress) अंतर्गत सुरू असलेली धुसफूस थांबण्याचे नाव घेत नाही आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालांनंतर काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यांनतर काँग्रेस नेतृत्वावरच टीका होऊ लागली. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गोंधी (soniya gandhi) यांनी बैठक घेत नाराजी दूर करण्याचा आणि नव्या जोमाने काम करण्याचा सल्ला दिला. यांनतर काँग्रेसमधील वाटेवर काहीसे शांत झालेले असताना आता आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल (ahmed patel) यांचा मुलगा फैसल पटेल (faisal patel) पक्षावर नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यांनी केलेल्या ट्विटवरून आगामी काळात फैसल पटेल काँग्रेस पक्ष सोडू शकतात, असे दिसते. त्यांनी केलेलं ट्विट हेच दर्शवित आहे.
दरम्यान, अहमद पटेल यांचा मुलगा फैसल पटेल याने आज ट्विट करून मी वाट पाहून थकलो आहे, असे लिहिले आहे. तसेच सर्वोच्च नेतृत्वाकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. त्यांनी पुढे लिहिले की त्यांनी आपल्या बाजूने सर्व पर्याय खुले ठेवले आहेत. गांधी घराण्याशी जवळीक असलेले अहमद पटेल हे एकेकाळी पक्षातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती मानले जात होते.
फैसल पटेल यांनी केलेल्या ट्विटमुळे काँग्रेसला सावध होणं गरजेचं आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे नोव्हेंबर २०२० मध्ये दीर्घ आजाराने निधन झाले. अशा स्थितीत आता दोन वर्षांनंतर त्यांचा मुलगा फैजल यांची काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर आली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी एप्रिलमध्ये फैसलने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal Chief Minister of Delhi) यांची भेट घेतली होती. त्यानंतर ते आम आदमी पार्टीत (aam aadmi party) सामील होण्याची शक्यता वर्तवली जात होती.