मुंबई/प्रतिनिधी
देशाच्या क्रीडाक्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार ओळखला जात होता. पण शुक्रवारी मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारा असं केलं आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर काँग्रेस नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलेलं आणि प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या धान्यांच्या गोणींवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो असल्याने निशाणा साधला आहे.
दरम्यान, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी “काँग्रेसनं एकच नाव बदललं, ज्याची सर मोदींना कधीच येणार नाही. बांगलादेश”, असं ट्वीट त्यांनी केलं आहे. अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्वीट करत त्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान, टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघाने केलेल्या कामगिरीमुळे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा निर्णय घेटाला आहे.