ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार अहमद पटेल यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मी माझी कोरोनाची टेस्ट केली असता त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी सुरक्षेच्या दृष्टीने स्वतःहून क्वारंटाइन व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अहमद पटेल यांनी नुकत्याच झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सहभाग घेतला होता.
दरम्यान, अहमद पटेल यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समजताच काँग्रेस नेते जयराम रमेश, मुकुल वासनिक, काँग्रेसचे माजी प्रवक्ते आणि आत्ताचे शिवसेना नेता प्रियंक चतुर्वेदीसह अनेक नेत्यांनी त्यांची प्रकृती लवकर सुधारावी यासाठी प्रार्थना केली.









