प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरात सुमारे पाच किलोमीटर लांब भव्य अशी ट्रॅक्टर रॅली निघते. नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत झालेले मेळावे तसेच रॅलीमध्ये ट्रॅक्टरवर दिमाखात बसलेली नेतेमंडळी पोलीस प्रशासनाला दिसली नाही. मात्र शिवाजी पेठेत फिरंगाई प्रभागात झालेला मेळावा मात्र पोलीसांच्या नजरेत भरला. त्यांनी माझ्Îासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. हा अन्याय असून गृहमंत्र्यांनीच गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीसांवर दबाव टाकल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषदेत गृहराज्यमंत्री आणि जिल्हÎाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता केला.
शहरप्रमुख इंगवले म्हणाले, आरक्षण सोडत झाल्यानंतर तत्काळ फिरंगाई प्रभागातून इच्छुक असलेल्या एका उमेदवाराने 50 ते 60 नागरिकांसमवेत रॅली काढली. ही रॅली पोलीसांच्या नजरेतून सुटली. आपण प्रभागात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळण्यासाठी रितसर पोलीस प्रशासनाकडे अर्ज केला होता. मात्र पोलीसांनी परवानगी नाकारली. आम्ही रॅली काढल्यावर तत्काळ माझ्यासह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला. मात्र प्रभागात रॅली काढणाऱया दूसऱयांवर गुन्हा दाखल केला जात नाही.
तसेच दोन महिन्यांपुर्वी एका पक्षाने शहरात भव्य अशी ट्रॅक्टर रॅली काढली. गृहमंत्री रॅलीमध्ये वरिष्ठ नेत्यांचे सारथ्य केले. तसेच नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत मोठयासंख्येने मेळावे झाले. येथे गर्दी झाली नाही का, सोशल डिस्टंसिंगचा येथेही फज्जा उडाला. त्याच बरोबर सध्या शहरात लग्न, साखरपुडा, बारसे असे कार्यक्रमही शासनाचे नियम डावलून होत आहेत. मग त्यांच्यावर गुन्हा दाखल का होत नाही. केवळ रविकिरण इंगवले व त्यांचे कार्यकर्तेचे पोलीस प्रशासनाला कसे दिसतात. असा प्रश्न उपस्थित करत हे गृहराज्यमंत्र्यांनी व्यक्तीद्वेषातून केलेले षडयंत्र असल्याचा आरोप इंगवले यांनी केला.
पत्रकार परिषदेला अनिल इंगवले, बाबासो पाटील, बाळासाहेब शिंदे, किशोर पाटील, सुकुमार लाड, संदीप साळोखे, सोनु चव्हाण, सुभाष पाटील, अविनाश कुलकर्णी, प्रदीप इंगवले, विराज शेंडे, कमलाकर दळवी आदी उपस्थित होते.
वरिष्ठांकडे तक्रार
पोलीसांनी केलेल्या गुन्हासंदर्भात पक्षातील वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. याची दखल पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही घेतील. तसेच संपर्कप्रमुख उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, संपर्कप्रमुख अरुण दूधवाडकर हे आज कोल्हापुरात येणार असून ते गुन्हा दाखल केल्यासंदर्भात पोलीस प्रशासनाला जाब विचारणार आहेत.
बावड्यातील कार्यक्रमावर गुन्हा दाखल करावा
कसबा बावडा येथे रविवारी पाण्याच्या टाकीचे उद्घाटन आणि विविध विकास कामांचा शुभारंभ सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. या कार्यक्रमालाही मोठयासंख्येने नेतेमंडळी व नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तेंव्हा पोलीस प्रशासनाने या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱयांवरही गुन्हे दाखल करण्याची तत्परता दाखवावी, असे इंगवले म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









