मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी : भाजपच्या आमिषांना बळी पडू नका
प्रतिनिधी / बेळगाव
काँग्रेसनेही प्रचारात बाजी मारली असून मंगळवारी ग्रामीण भागामध्ये कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार केला. याचबरोबर कॉर्नर सभाही घेतल्या. यावेळी भाजपच्या आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन करत काँग्रेसला मतदान करा, असे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना सांगितले.
गेल्या 15 दिवसांपासून काँग्रेसने दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदार संघांमध्ये जोरदार प्रचार केला आहे. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांना मतदान करा, असे आवाहन करण्यात येत आहे. विविध ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेऊन काही समाजाच्या बैठकाही घेतल्या आहेत. काँग्रेसलाही उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
भाजपने सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली आहे. त्यांनी खोटी आश्वासने दिली आहेत. आताही ते खोटी आश्वासने देत आहेत. त्यामुळे त्यांच्या आश्वासनांना कधीच बळी पडू नका. काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांना मतदान करा, असे आवाहन काँग्रेसचे कार्यकर्ते मतदारांना करत आहेत. शहरासह ग्रामीण भागात प्रचार करत असताना अनेक संघटना आणि संस्थांनी त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. यावेळी येळ्ळूर ब्लॉक अध्यक्ष किरण पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.









