प्रतिनिधी / कोल्हापूर
करवीर कन्या गिर्यारोहक कस्तुरी दीपक सावेकर हिला माऊंट एव्हरेस्ट मोहिम 2020 चढाई यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा व राष्ट्रध्वज प्रदान करण्यात येणार आहे. रविवार दि.8 मार्च 2020 रोजी आयोजीत माऊंट एव्हरेस्ट मोहिम 2020 या ध्वजप्रदान समारंभात तिला राष्ट्रध्वज व भगवा ध्वज प्रदान करण्यात येणार आहे. हा समारंभ पन्हाळा रोडवरील गुरूकृपा सांस्कृतिक भवन येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. अशी माहिती करवीर हायकर्सने पत्रकाव्दारे दिली आहे.
कस्तुरीच्या आजअखेर सुमारे 137 मोहिमा फत्ते
यापूर्वी कस्तुरीला वयाच्या 3 ऱया वर्षांपासून डोंगर, द़या खुणावत होत्या. यातूनच तिने आत्तापर्यंत तब्बल 137 मोहिमा यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. आता तिने जगातील सर्वात उंच पर्वतशिखर ज्याची उंची 29 हजार 29 फूट उंच असणाऱया माऊंट एव्हरेस्ट सर करण्याचे लक्ष ठेवले आहे. सध्या ती इयत्ता 12 वीमध्ये शिकत असून माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा संकल्प करणारी पश्चिम महाराष्ट्रातील ती प†िहली गिर्यारोहक असणार आहे. मंगळवार दि.31 मार्च 2020 रोजी कोल्हापूरमधून कस्तुरी कोल्हापूरमधून माऊंट एव्हरेस्टकडे रवाना होणार आहे. यापूर्वी तिने हिमालयातील कठीण असणारे 21 हजार 246 फूट उंचीचे माऊंट मेरा पीक अवघ्या 12 दिवसांत सर केले आहे. मात्र, एव्हरेस्ट सर करताना तिला अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे. यासाठी तिच्या शारारिक क्षमतेबरोबर मानसिक क्षमतेचाही कस लावावा लागणार आहे.
मोहिमेसाठी 42 लाख रुपयांचा खर्च
माऊंट ऐव्हरेस्ट मोहिमेसाठी सुमारे 42 लाख रुपयांचा खर्च अपेक्षीत आहे. या खर्चाचे आव्हान आपल्या करवीरवासियांसोबत ज्यांनी स्वीकारले. ते आपल्या पश्चिम महाराष्ट्रातील कऱहाड, जयसिंगपूर, गडहिंग्लज आदी ठिकाणच्या दानशूर शिक्षणसंस्था व व्यक्तींची कार्यक्रमासाठी उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमासाठी यांची असणार उपस्थिती
ध्वजप्रदान समारंभासाठी करवीर संस्थानच्या युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, महापौर निलोफर आजरेकर, आयुक्त डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, उमेश झिरपे, ज्येष्ठ गिर्यारोहक व संस्थापक अध्यक्षा गिरीप्रेमी संस्था (पुणे) उषःप्रभा पागे, कर्नल एम.के.तिवारी, इतिहास अभ्यासक वसुधा जयसिंगराव पवार, प्रतिमा पाटील, अरुंधती महाडिक, विद्याताई पोळ, राजेंद्र पाटील, जयश्री जाधव आदींसह गिरीप्रेमी उपस्थित राहणार आहेत.