मुंबई
आयात करण्यात येणाऱया वस्तुंकरता होणारा उशीर दूर करण्यात आला असून कस्टम (जकात) विभागाने यात सुधारणा केल्या असल्याचे समजते. समुद्रमार्गे वाहतुक झालेल्या वस्तुंना आता 48 तासात मंजुरी मिळताना दिसते आहे. याकरीता आधी 72 तासांपेक्षाही अधिक कालावधी लागायचा. आयातीत वस्तुंच्या मंजुरीकरीता कस्टम विभागाकडून उशीर होत असल्याच्या तक्रारी उद्योग जगतातून होत होत्या. त्याची दखल घेत कस्टम विभागाने आता त्वरेने मंजुरी मिळवून देण्याची प्रक्रिया राबवली आहे.









