महसुल व पाटबंधारे कार्यालयाचे साफ दुर्लक्ष
कसबा सांगाव / वार्ताहर
कागल – हातकणंगले पंचताराकिंत औद्योगिक वसाहती जवळून गेलेल्या दुधगंगा डावा कालवा उपविभाग अंतर्गत खोदकामातून निघालेल्या दगड मुरुमाच्या वाहतुकीस चारशे ब्रासची परवानगी दिली असताना बालाजी इन्फ्राटेक अँन्ड कन्स्ट्रक्शन यांनी हजारो ब्रास दगड मुरुम वाहतुक करून नेत आहेत. याकडे महसुल व पाटबंधारे कार्यालयाचे साफ दुर्लक्ष होत असून त्यामुळे संबधित विभागाचा महसुल बुडत आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दुधगंगा डावा कालवा उपविभाग क.वाळवा अंतर्गत खोदकामातून निघालेला दगड मुरूम कसबा सांगाव ता. कागल गट नं. ४३७, ४३९ या जमीनीत पडून आहे. त्यातील चारशे ब्रास दगड मुरुम वाहतुक करण्याची परवानगी बालाजी इन्फोटेक अँन्ड कन्स्ट्रक्शन यानी १८ मार्च रोजी घेतली आहे. त्यांची रॉयल्टी भरून त्याच परवानगी वर परवानगी पेक्षा जादा दगड मुरूम आजतगायत घेऊन जात आहे. चारशे ब्रासच्या व्यत्यरिक्त जो जादा दगड मुरुम कोणत्याही रॉयल्टी न भरता तसेच वाहतुक परवाना न घेता घेतला जात आहे.त्याचा वापर कंपनी करत आहे.
संबधित कंपनीला फुकटात हजारो ब्रास दगड मुरूम उपल्बध होत असताना संबधित विभागाचा महसुल बुडत आहे. याबाबत पंचनामा करून जादा दगड मरूम उचल केलेबाबत कारवाईची व्हावी यांची मागणी होत आहे. कोरोनाचा दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या लॉकडाऊन,कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमी उपस्थित असल्याचा गैरफायदा घेऊन जादा दगड मुरूम उचल होत आहे. परवानगी नुसार दगड मुरूम वाहतुक होत आहे का यासाठी कोणत्याही यंत्रणा नाही. अथवा संबधित विभागाच्या कर्मचाऱ्याचे लक्ष नाही.