वार्ताहर / कसबा सांगाव
कसबा सांगाव तालुका कागल येथील २८ वर्षीय तरुणाने जीवनात आलेल्या नैराश्यातून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पंचताराकिंत औद्योगिक वसाहतीलगदच्या शेतजमीनीतील कसबा सांगाव हद्दीतील राहत्या घरी सकाळी १० वाजता सुमारास ही घटना घडली. विश्वजित देवगौंडा पाटील वय २८ असे मयताचे नांव आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पंचतारांकित औद्योगिक वसाहती शेजारी असलेल्या कसबा सांगाव हद्दीतील शेत जमीन गट नंबर ३४१ मध्ये राहत्या घरात विश्वजीत देवगोंडा पाटील वय वर्ष २८ तरूणाने घराच्या रूममध्ये लोखंडी पाइपला वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. रुद्रगोंडा शिवगोंडा पाटील (कसबा सांगाव) यांनी कागल पोलीस ठाण्यात माहिती कळविली. याबाबत कागल पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वाकचौरे यांनी सदर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कागल ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.