प्रतिनिधी / कसबा सांगाव
कसबा सांगाव येथे ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने लोकसहभागातून सैनिक हॉल येथे ४० बेडचे कोव्हीड केअर सेंटरचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील व सरपंच रणजीत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. गावातील उद्योजक, तरुण मंडळे, सहकारी संस्था व गावातील नागरिकांच्या मदतीने महिला व पुरुषासाठी वेगवेगळे अद्यावत कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे.
यावेळी कागल पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी शबाना मोकाशी, मेट्रो हाय-टेकचे अध्यक्ष भरत पाटील बाजार समितीचे संचालक कृष्णात पाटील, आनंदराव कदम, ग्रामविकास अधिकारी एस.पी.कांबळे, डॉ. शिंदे, पोलीस पाटील छाया हेगडे, ग्रा.प सदस्या उज्वला माळी, वैशाली कुंभार, सुनिता जगताप, अर्पणा आवळे, किरण पास्ते, बापू शेटे, संतोष माळी, बाळासो लोखंडे, शकील कलावंत, अमर कांबळे, प्रभु भोजे, बाळासो निंबाळकर, संजय जगताप, ग्रामपंचायत सदस्य तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी व आशा कर्मचारी उपस्थित होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









