प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील कसबा बावडा परिसरातील 55 वर्षीय पुरूषाचा गुरूवारी सीपीआरमध्ये कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 749 झाली आहे. कोरोनाचे 32 नवे रूग्ण दिसून आले तर 40 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 296 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील माळी यांनी दिली.
जिल्ह्यात गुरूवारी कसबा बावड्यातील एकाचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे बळींची संख्या 1 हजार 749 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील 853, नगरपालिका क्षेत्रात 349, कोल्हापूर शहरात 389 तर अन्य 158 जणांचा समावेश आहे. दिवसभरात 40 जण कोरोनामुक्त झाले. आजपर्यत कोरोनामुक्तांची संख्या 48 हजार 728 झाली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 32 रूग्ण दिसून आले. यामध्ये आजरा 0, भुदरगड 0, चंदगड 0, गडहिंग्लज 2, गगनबावडा 0, हातकणंगले 2, कागल 0, करवीर 2, पन्हाळा 0, राधानगरी 0, शाहूवाडी 0, शिरोळ 0, नगरपालिका क्षेत्रात 6, कोल्हापूर शहरात 13 तर अन्य 7 जणांचा समावेश आहे.
शेंडा पार्क येथील आरटीपीसीआर, सीबीएनएएटी लॅबमधून गुरूवारी आलेल्या 400 अहवालापैकी 380 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 19 अहवाल आले. ते सर्व निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 222 रिपोर्ट आले. त्यातील 192 निगेटिव्ह आहेत. जिह्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्ण 50 हजार 773 आहेत. त्यापैकी 48 हजार 728 कोरोनामुक्त झाले आहेत. आजअखेर 296 रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती डॉ. माळी यांनी दिली.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









