प्रतिनिधी/ खेड
मुंबईतून चाकरमानी मोठय़ा संख्येने गावी येण्याच्या शक्यतेने कशेडी घाटातील तपासणी नाका येथे अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करून बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारास तब्बल 39 चाकरमान्यांना पोलिसांनी ताब्यात घेत आरोग्य प्रशासनाच्या स्वाधीन केले.
या सर्वांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर लवेल येथील घरडा अभियांत्रिकी महाविद्यालयातील कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. यापूर्वी या ठिकाणी 77 जण देखरेखीखाली होते त्यातील आणखी 7 जणांना घरी सोडण्यात आले. यात 39 जणांची नव्याने भर पडल्याने ही संख्या 109 वर पोहोचली आहे. कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातील कक्षात 30जण देखरेखीखाली आहेत.
75जणांचे अहवाल निगेटिव्ह
क्वॉरंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांच्या स्व्Ÿाबचे नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले होते. 104पैकी 75 जणांचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला असून सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला आणखी दिलासा मिळाला आहे. 29 जणांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.









