नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून अशी चर्चा
कळंबा / प्रतिनिधी
कळंबा येथील टिपूगडे गल्लीत राहणाऱ्या एका युवकाने राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास कळंबा ( ता. करवीर) येथे उघडकीस आली. विवेक विश्वास गौड (वय 35, रा. टिपूगडे गल्ली, कळंबा, ता. करवीर) असे आत्महत्या केलेल्यांचे नाव आहे. यांची नोंद करवीर पोलिसात झाली आहे. त्याच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे.
मृत युवक विवेक गौड हा बेरोजगार युवक आहे त्याने अनेक ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न केले तरीदेखील त्याला कोठेही नोकरी मिळाली नाही मृत विवेक गौड यांचे वडील सरकारी खात्यामध्ये नोकरीवर होते. नोकरीवर असतानाच त्यांच्या वडीलाचे अकस्मित निधन झाले. तो गेले काही महिने नैराश्याग्रस्त बंनला होता आज सकाळी राहत्या घराच्या पहिल्या मजल्यावर बेडरूम मधल्या स्लॅपच्या हुकाला नाययलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचे नेमके कारण समजले नसले तरी देखील त्याने नोकरी मिळतं नसल्याच्या करणातून आत्महत्या केली असावी अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मंगळवारी सकळी 8 च्या सुमारास त्यांच्या कुटूंबीयांच्या निदर्शनास आली. या घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करुन, मृतदेह शवविवेच्छनासाठी सीपीआर रुग्णालयात पाठविला. तसेच त्याच्या आत्महत्या मागे अन्य दुसरे कारण आहे का याचा अधिक तपास पोलिसांनी सुरू केला आहे .पोलीस ठाण्यात आकस्मित मयत म्हणून या घटनेची नोंद झाली आहे. यांचा प्राथमिक तपास सहाय्यक फौजदार निवास पोवार व कॉन्स्टेबल रोहन वाकरेकर करीत आहेत.