प्रतिनिधी / कळंबा
कळंबा येथील पावरग्रीडकडे जाणाऱ्या रोडवरील एका फार्म हाऊसनजीक सुरू असलेल्या सुरु असलेल्या दोन तीन पानी जुगार अड्यावर पोलिसांनी रविवारी रात्री छापा टाकला. पोलिसांची चाहुल लागताच अड्डा मालक दिगंबर पाटील ( संपूर्ण नान पत्ता माहित नाही ) हा पसार झाला असून, बारा जुगरिना अटक केली. त्याच्याकडून ३१ हजार १६० रुपयांची रोकड, मोबाईल हॅण्डसेट असा १ लाख १६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला . ही कारवाई कळंबा चौकीचे पोलीस नाईक विजय तळसकर आणि त्यांच्या पथकाने केली.
अटक केलेल्यांच्यामध्ये विक्रम बाळासो बजागे ( रा . पडवळवाडी ) , अल्ताफ सरदार बागवान ( रा लक्षतीर्थ वसाहत , कोल्हापूर ) आकाश राजेंद्र सुर्यवंशी ( रा सुर्वेनगर , कळंबा ) वैभव विक्रम कुलकर्णी ( रा . राजोपाध्यायनगर , कोल्हापूर ). सुजीत शंकर सातपुते ( रा कोतोली , ता.पन्हाळा ) , सागर मारुती यादव ( रा . ऊंड्री, ता . पन्हळा ) , प्रतिराज सुरेश पोवार ( रा सानेगुरुजी वसाहत , कोल्हापूर ) , दत्तात्रय आनंदराव खुडे ( रा . शिरगाव , ता . राधानगरी ) , रोहन अशोक भोसले ( रा . लक्षतीर्थ वसाहत , कोल्हापूर ) , विश्वास सदाशिव जगताप ( रा . अमूतसिध्दी हॉलनजीक , कळंबा ) जयदिप राजाराम अतिग्रे ( रा . पडवळवाडी , ता . करवीर ) निलेश बाबूराम गवळी ( रा . गणेशनगर , चंबूडी , ता . करवीर ) याचा समावेश आहे . दिगंबर पाटील ( संपूर्ण नाव पत्ता माहित नाही ) याने येथील पावरग्रीडकडे जाणाऱ्या रोडवरील फार्म हाऊसनजीक तीन पानाचे दोन जुगार अड्डा सुरु केला आहे. अशी माहिती बातमीदाराकडून पोलिसांना समजली त्यावरून अड्ड्यावर करवीर पोलीस ठाण्याच्या अंकीत असलेल्या कळंबा पोलीस चौकीचे पोलीस नाईक विजय तळसकर यांना समजली. त्यांनी आपल्या पतकाद्वारे या जुगार अड्यार छापा टाकला.









