कळंबा : प्रतिनिधी
कळंबे तर्फ ठाणे येथील प्रभागातील क्र 6 मधील ग्रामपंचायत सदस्या अलका माने यांचे निधन झाल्याने सदस्य पद रिक्त झाले होते. या रिक्त जागेवर सतेज पाटील गटाच्या दीपाली माने यांची बिनविरोध निवड झाली. पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने हि निवड झाल्याचे दीपाली माने यांनी सांगितले.
दरम्यान, नूतन ग्रामपंचायत सदस्या दीपाली माने यांचा अजिंक्यतारा येथे सत्कार करण्यात आला. यावेळी कळंबा गावचे सरपंच सागर भोगम, गट नेते उदय जाधव, संजू माने, ग्रामपंचायत सदस्य सुहास जंगम, संग्राम चौगले, राजू गुरव, आदि उपस्थित होते.