50 लाखांचे नुकसान : शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज,वाऱयामुळे आग सर्वत्र पसरली,अग्निशामक दलाच्या साहसी कामगिरीमुळे आगीवर नियंत्रण
प्रतिनिधी /म्हापसा
मुड्डावाडा-कळंगूट येथील समुद्रकिनाऱयावर असलेल्या दोन शॅकना आग लागून त्यातील समानाची राख झाली. यामध्य्ये 50 लाखांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. मंगळवारी पहाटे 2.30 वा. ही आग लागण्याची घटना घडली. जोरदार वाहणाऱया वाऱयामुळे आगीचे लोण इतरत्र पसरू नये म्हणून अग्निशामक दलाने जीवाची बाजी लावून आग आटोक्मयात आणल्याचे प्रयत्न केले, मात्र दोन्ही शॅक पूर्णतः जळून खाक झाले
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेपूर्वी तासभर आधी शॅक मालक शॅक बंद करून आपल्या घरी गेला होता. काही कामगार शॅकवरच विश्रांती घेत थांबले होते. कामगारांनीच आगीच्या घटनेची माहिती मालक तसेच अग्निशामक दलाला दिली. आगीचे स्वरुप पाहता आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी म्हापसा तसेच पणजीवरून अतिरिक्त वाहन मागवणे भाग पहले. अडीच तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश प्राप्त झाले. शेजारील इतर शॅक आजूबाजूला लागून असल्याने वाऱयामुळे आगीचे लोण इतर शॅकपर्यंत पोहोचू नये, यासाठी दलाच्या जवानांनी शेजारील शॅकवर पाणी फवारून भिजवल्यामुळे मोठा अर्न्थ टळला.
पाचपैकी दोन सिलिंडरचा स्फोट
आग विझवताना त्यात असलेल्या दोन सिलिंडरचा स्फोटसुद्धा झाला. त्यामुळे काही प्रमाणावर अडथळे निर्माण झाले. रॉकमध्ये 5 सिलिंडर होते पण कामगारांनी दोन सिलिंडर बाहेर काढले होते. तसेच दोन्ही शॅकमध्ये असलेले जनरेटरचाही आग लागल्याने स्फोट झाला. एक सिलिंडर बाहेर काढत असताना त्यालाही आग लागली. मात्र ती आग विझविण्यात यश आले. शॅक मालकांनी दोन दिवसांपूर्वी दारुचा स्टॉक आणून ठेवला होता. त्यालाही आग लागून पूर्णतः जळून खाक झाले.
पिळर्ण अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीकृष्ण पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी अत्यंत साहसी कामगिरीमुळे आगीवर नियंत्रण मिळविले. उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, सर्वात प्रथम शॅकमधील वाहिनीने पेट घेतला. त्या आगीच्या ठिणग्या कार्पेटवर पडल्या व नंतर इतर वस्तूंवर पडल्या त्यामुळे आगीने पेट घेतला. किनाऱयावर जोरदार वारे असल्यामुळे आगीने रौद्रावतार धारण केले व काही क्षणातच शॅक जळून खाक झाले.
म्हापसा अग्निशामक दलाचे अधिकारी बॉस्को फेर्राव यांच्या नेतृत्वाखाली लीडिंगी फायरमन रणजीत गावकर, जयेश कांदोळकर, अर्जुन धावस्कर, प्रवीण पिसुर्लेकर, विष्णू केसरकर, दिलीप सावंत, पणजी मुख्यालयाचे लीडिंग फायरमन चंद्रकांत तुरी, सचिन परब, बाबुराव आरोंदेकर, रोहित उसापकर, पिळर्णचे अधिकारी कृष्णा पर्रीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप मांद्रेकर, साईश च्यारी, हेमंत हंसकट्टी, भावेश शिरोडकर, राजेश पिळर्णकर, निखिल सावळ यांनी अथक परिश्रमांने आगीवर विझविण्यात यश आले. आगीत दोन शॅक जळून पूर्णतः खाक झाले असली तरी दलाच्या जवानांनी बाजूचे अन्य शॅक आगीपासून वाचविले.
पंचायतीतर्फे दोघांना प्रत्येकी लाखाची मदत : सरपंच सिक्वेरा

कळंगूट दोन शॅकना आग लागल्याचे समजताच सकाळी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी घाटनास्थळी भेट दिली. पंतायतीतर्फे संबंध्घ्ति दोन्ही शॅकांना प्रत्येकी 1 लाख रुपये मदत म्हणून देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. समुद्र किनाऱयावर समुद्र किनाऱयावर दारू, बिअर, बाटल्या टाकल्या जातात. समुद्रावर खुर्च्या घालून बसतात याबाबत आम्ही पर्यटन संचालकाकडे तक्रार केली आहे. याकडे पर्यटन खात्याने लक्ष देण्याची मागणी त्यांनी केली.
किनाऱयावर आपत्कालीन बंब अत्यावश्यक : आमदार मायकल लोबो

ऐन पर्यटन महोत्सव सुरू झाला असतानाच कळंगूट समुद्र किनाऱयावर दोन शॅकना आग लागली. शर्व सामान खाक झाले आहे. नुकसानग्रस्त शॅक मालकांना सरकार दरबारी मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती स्थानिक आमदार मायकल लोबो यांनी दिली. यापूर्वीही अशा आगीच्या घटना येथे घडल्या आहेत. अशा आगीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी समुद्र किनाऱयावर आपत्कालीन बंब तैनात ठेवण्याची गरज आहे, अशी मागणी त्यांनी केली. यासंदर्भात अग्निशामक संचालक तसेच मुख्यमंत्र्यांना पत्र देणार असल्याचेही आमदार लोबो यांनी सांगितले.
फायबर होडीही भक्ष्यस्थानी
दरम्यान, शॅकच्या पाठीमागे बाजूलाच फायबरच्या एकूण चार होडय़ा बांधून ठेवण्यात आल्या होत्या यापैकी एका होडीला या आगीची झळ बसून ती जळून खाक झाली. त्यात चार लाख रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शॅक धारक मनोज, ब्रिजत रिओ यांच्या मालकीचे पॅफे सॅण्ड बार शॅक व बे वॉच शॅक पूर्णतः जळून खाक झाले. यात त्यातील सीसीटीव्ही पॅमेरे, संगणक, टीव्ही संच, विद्युत उपकरणे, साऊंड सिस्टम, वातानुकुलीत उपकरणे, भांडी, फ्रीज, लाकडी फर्निचर, खुर्च्या आदी सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मनोज यांनी आठ दिवसापूर्वीच शॅकमध्ये ग्राहकांसाठी दारू तसेच बिअर बाटल्या आणून ठेवल्या होत्या ब्रिजत रिओ याने अलिकडेच नवीन साऊंड सिस्टम आणली होते तेही पूर्णतः जळून खाक झाले. अशी माहिती या दोघांनी यावेळी पत्रकारांशी घटनास्थळी बोलताना दिली.
शॅकवर पत्रे घालण्यास परवानगी द्यावी : मान्यूअल कार्दोज
समुद्र किनाऱयावर सरकारच्या सुविधांचा अभाव आहे. येथे अग्निशामक दल, रुग्णवाहिकेचे गैरसोय आहे. कळंगुट हे पर्यटन क्षेत्र असल्याने अशा सुविधा उपलब्ध करण्याबाबत अनेकवेळा मागणी केल्याची माहिती शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष मान्यूअल कार्दोज यांनी दिली. मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. येथे गोमंतकीयांना बाजूला ठेवून दिल्लीवाल्यांना सहकार्य प्रयत्न सरकारकडून केला जातो. शॅकवर माडाची झावळे असल्यामुळे आग लागण्याची जास्त शक्यता असते त्यासाठी येथे पत्रे घालण्याची परवानगी द्यावी, याशिवाय दोन शॅकमधील किमान 10 मीटर अंतर ठेवावे, अशी मागणीही कार्दोज यांनी केली.









