प्रतिनिधी /म्हापसा
कळंगूट मतदारसंघ आज जगाच्या नकाशावर कोरला गेला आहे. आज देशभरात कळंगूटचे नाव आहे मात्र आज कळंगुटचे नाव अंमली पदार्थ, वेश्या व्यवसाय आणि आता गन परंपरेसाठी खराब होऊ लागले आहे. कळंगुटमध्ये आज गुह्याचे प्रमाण वाढलेले आहे आणि त्यावर आळा घालण्यासाठी कळंगुटचे पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ व स्थानिक मंत्री मायकल लोबो सपशेल अपयशी ठरले आहे. या दोघांमुळेच कळंगुटमध्ये गुह्याचे प्रमाण वाढलेले आहे. गुह्यावर आळा घालण्यापेक्षा हे दोघेही गुन्हेगाऱयांना संरक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. असा आरोप कळंगुटचे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा व माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी कळंगूट येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
कळंगुटमध्ये गुरुवारी सायंकाळी गोळीबारची घटना घडली ही दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. बिगर गोमंतकीय आज कळंगुटमध्ये खुलेआम पिस्तूल घेऊन फिरत आहे व धमकीही देऊ लागले आहे याला स्थानिक पोलीस व आमदार जबाबदार आहे. गोळीबार झाला नाही असे निरीक्षक रापोझ म्हणत असले तरी हे भूमिपुत्र पिस्तूल घेऊन फिरत आहे ही गंभीर गोष्ट असल्याचा आरोप माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी केला.
आता कळंगुटमध्ये गन परंपरा आली
कळंगुटमध्ये गन परंपरा आली तर आमचे काय राहिले. हॉटेल मालक म्हणतात ते आमच्या हॉटेलमध्ये राहत नव्हते ते कांदोळीत राहतात. हा मतदारसंघ कुणी सांभाळावा. पोलीस निरीक्षक नालास्को रापोझ म्हणतात गोळीबार झाला नाही देव पावला. हा कसला कायदा हे आपल्यास माहीत नाही. आज कळंगुटचे नाव वाईट गोष्टीसाठी प्रसिद्ध होऊ लागले आहे. आता गन परंपरा नंतर काय येणार हे सांगता येत नाही. आता निवडणूक येणार आहे त्यामुळे निरीक्षक रापोझ व मंत्री लोबो यांनी हे प्रशिक्षण घेतले असावे लोकांना मारहाण करण्यास. कळंगूट पोलीस निरीक्षकांच्या आशीर्वादाशिवाय असा प्रकार घडूच शकत नाही. कळंगुटमध्ये वाढत्या गुह्यासाठी तेच जबाबदार आहेत असा आरोप माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी केला. 2020 साली 12 डिसेंबरला आपण कळंगूट पोलिसांना पत्र लिहून काही ठिकाणी वेश्या व्यवसाय चालतो हे दाखवून दिले होते. मात्र त्यावर आजही कारवाई झाली नाही. त्यानंतर पुन्हा आपण फोटो व अमली पदार्थ व्यवसाय चालतो तेथील फोटो पाठविले. कांदोळीत मोटरसायकल घेऊन तुम्हाला ड्रग्स, मुली पाहिजे असे विचारतात. आपण हे पत्राद्वारे डिआयजीला पाठविले मात्र तरी येथे कारवाई होत नाही. मात्र येथील आमदार काहीच करायला देत नाही. आमदार बुवानी हे बंद करावे अखेर आम्हालाच शेवटी कळंगूट मतदारसंघ पहावा लागणार. आमचा कळंगूट गाव संपत आला आहे आता कळंगुटमध्ये काय राहिले आहे. रापोझ आपले तोंड बंद करण्यासाठी त्वरित आपल्यावर दोन एफआयआर दाखल करतात. मग हे गुन्हे आदी त्यांना दिसत नाही काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतर गुह्यावर कारवाई का होत नाही असा प्रश्न जोसेफ सिक्वेरा यांनी केला.
कायदा सुव्यवस्था बिघडली
कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडली आहे. आज कुणालाच कुणाचा भय राहिलेला नाही. आज कळंगुटमध्ये मोडतोड होते हे निरीक्षक रापोझ यांच्या कृपाशीर्वादानेच होते. आज कळंगुटमध्ये मुलीची कार्डे वितरित केली जातात, आज अमली पदार्थाची कार्डेही येण्यास उशीर लागणार नाही. काल कळंगुटवासियांनी दाखवून दिले आहे आम्हीही कायदा सुव्यवस्था हाताळू शकतो. पोलीस नागरिकांना मदत करीत नाही उलट ते गुन्हेगारांनाच मदत करण्यास धावतात. आता जनतेलाच कायदा हातात घ्यावा लागणार आहे असे आग्नेल फर्नांडिस म्हणाले.
पोलिसांवरील विश्वास उडाला आहे
कळंगुटमध्ये सिद्धी नाईक, शिवोलीत रशीयनचे निधन झाले. योग्यरीत्या तपास करण्यात आला नाही. नैसर्गिक मृत्यू नोंद केले. नंतर वडिलांच्या तक्रारीवरून व दुतवासाच्या तक्रारीवरून कळंगूट पोलिसांनी हे प्रकरण खून म्हणून नोंद केले आहे. सिद्धी खून प्रकरण आजपर्यंत खुनी सापडत नाही. व्हिसेरा नसताना तो आहे म्हणून सांगितले. कोविडवेळी सर्व आतमध्ये येतात मग गन घेऊन आले तर काय मोठे. स्थानिकांना पोलीस त्रास करतात मात्र बाहेरील इसमांना हप्ते घेऊन पोलीस मदत करतात. आज पोलिसांचा भय राहिलेला नाही. बिगर गोमंतकीय लोक आता राज्यात खुलेआम पिस्तोल घेऊन फिरू लागले आहे अशी माहिती त्यांनी दिली.
नालास्को रापोझ यांच्यावर कारवाई करा
कांदोळी, कळंगूट, हडफडे, नागवा, पर्रा स्वच्छ ठेवा. आम्हाला अमली पदार्थ नको, वेश्या व्यवसाय नको आणि आता गन कल्चर नको असे माजी सरपंच जोसेफ सिक्वेरा म्हणाले. आज पोलीस घुसपलेले आहे. आम्ही निरीक्षक रापोझ विरोधात आठ तक्रारी दिल्या. सगळय़ा पोलिसांची बदली झाली मात्र यांचीच होत नाही यामागे कोणते मध लागलेले आहे हे आपल्यास माहीत नाही. असे सिक्वेरा म्हणाले. गुन्हेगारावर रापोझ यांनी कारवाई करावी अन्यथा आम्ही दाखवून देतो कारवाई कशी करावी ती.









