म्हापसा/ प्रतिनिधी
कळंगुट पंचक्रोशी विकास कामांच्या बाबतीत जरी अग्रेसर असली तरी अद्याप वीज पाणी तसेच इतर महत्वाच्या गोष्टींची कमतरता स्थानिकांना ग्रासते आहे. येथील मलनिस्सारण प्रकल्प तसेच वीज उप केद्राची पंचक्रोशीला नितांत आवश्यकता असून लवकरात लवकर कळंगुट पंचायत तसेच स्थानिक ग्रांमस्थाच्या सहकार्याने ही कामे पुर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन कळंगुटचे आमदार तथा ग्रामीण विकास मंत्री मायकल लोबो यांनी दिले.
कळंगुट पंचायतीच्या सरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आलेल्या शॉन मार्टीन्स यांना दुसऱयांदा त्या पदावर विराजमान करण्यात आल्यानंतर स्थानिक प्रसार माध्यमांशी मंत्री लोबो बोलत होते.
शॉन मार्टीन्स यांनी याआधी कळंगुट जिल्हा पंचायत सदस्य म्हणूनही यशस्वीरीत्या काम सांभाळलेले आहे. दरम्यान, मावळते सरपंच दिनेश सिमेपुरुषकर यांनी ठरल्या करारानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले होते. यावेळी पंचायतीच्या उप-सरपंच सौ. पुजा मठकर,सौ. चोडणकर, माजी सरपंच तथा विद्यमान पंच सदस्य एन्थ?नी मिनेझिस, फ्रान्सिस रॉड्रीगिश, दिनेश सिमेपुरुषकर, सुदेश मयेंकर, पंचायत सचीव बागकर आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, कळंगटच्या सरपंचपदी दुसर्यांदा विराजमान होण्याची संधी लाभल्याबद्दल सरपंच शॉन मार्टीन्स यांनी मंत्री मायकल लोबो यांचे आभार मानले तसेच भविष्यात कळंगुटच्या विकासासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे आश्वासन दिले.









