वृत्तसस्था/ बेंगळूर
दागिन्यांच्या विश्वात लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱया कल्याण ज्वेलर्सचे दिल्ली एनसीआर येथे 150 वे दालन नुकतेच सुरू करण्यात आले आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत सदरच्या नव्या दालनाची नुकतीच सुरूवात करण्यात आली आहे.
नोएडा येथील द ग्रेट इंडिया प्लेस जीआयपी मॉल अणि वेगास मॉल येथे द्वारकामध्ये नव्या शोरूमचे उदघाटन करण्यात आले. कल्याण ज्वेलर्सच्यावतीने ऍम्बॅसेडर वामिका गाब्बी (पंजाब), मंजूर वॉरीयर (केरळ) आणि रिताभरी चक्रवर्ती (पश्चिम बंगाल) यांच्या हस्ते शोरूमचे उदघाटन करण्यात आले. या नव्या शाखेसह भारत आणि मध्य पूर्व भागात शोरूम्सची संख्या आता 150 वर पोहचली आहे. विविध बाजारांमध्ये कल्याण ज्वेलर्सने अलीकडच्या काळात आपला व्यवसाय विस्तारला आहे. यावेळी कल्याण ज्वेलर्सचे अध्यक्ष टी. एस. कल्याणरामन यांनी 150 व्या शाखेची सुरूवात ही खूप आनंदाची बाब राहिली आहे. कंपनीची ही सुवर्ण कामगिरी असल्याचेही त्यांनी सांगितले.









