परिसरात फिरुन कलिंगडाची विक्री करण्याचे दिले परवाने
प्रतिनिधी/औंध
कोरोनामुळे साडेचार एकरातील कलिंगडे शंभर टन कलिंगडे खपवायची कुठे या पेचात सापडलेल्या नांदोशीतील शेतकऱ्याच्या मदतीसाठी मंडल कृषी विभागाने धाव घेतली आहे. परिसरात फिरुन कलिंगडाची विक्री करण्यासाठी शेतकऱ्याला विक्री परवाने देण्यात आले आहेत.
कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे कराड सातारचे मार्केट बंद आहे. तर सांगली कोल्हापूरला मालाची आवक जास्त असल्याने माल खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी नकार कळवल्याने शंभर टन कलिंगडाची विक्री करायची कुठे याबाबत नांदोशी ता खटाव येथील कलिंगड उत्पादक शेतकरी विठ्ठल चव्हाण यांच्या पुढे पेच पडला होता. मात्र या शेतकऱ्याच्या मदतीला आता औंध मंडल कृषी विभागाने धाव घेतली आहे. प्रभारी मंडल क्रुषी अधिकारी विजय वसव, क्रुषी सहाय्यक आर. एस. ठोंबरे यांनी आज प्रत्यक्ष बांधावर जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. प्लाटची पाहणी केली आणि तालुक्यातील गावात तसेच सातारा शहर परिसरात योग्य ती खबरदारी घेऊन शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करुन वाहनातून कलिंगडे विक्री करण्यासाठी विक्री परवाने शेतकरी चव्हाण यांना दिले आहेत.
शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न
महामारीच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत आला आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र तयार झालेल्या मालाची विक्री झाली पाहिजे. त्याचे आर्थिक नुकसान होऊ नये याकरिता जिल्हा क्रुषी अधिकारी महेश झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कलिंगड विक्री.साठी तीन वाहनाचे परवाने देऊन शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. – विजयराव वसव, प्रभारी मंडल क्रुषी अधिकारी औंध
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








