प्रतिनिधी/ पणजी
कला व संस्कृती खात्यातर्फे प्रत्येक वर्षी आयोजित केला जाणारा डी. डी. कोसंबी महोत्सव यंदा 27 ते 30 जानेवारी असे चार दिवस कलाअकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात होणार आहे. यंदाचे हे 20 वे वर्षे आहे. 27 रोजी सायं. 5 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.
तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभणार
यावेळी प्रथमच देशातील लोकप्रिय अशा चार महिला वक्त्यांची निवड करण्यात आली. पहिल्या दिवशी 27 रोजी 5.30 ते 7.30 वा. या वेळेत ऑलिंपिक्स’ मध्ये भारत वेटलिफ्टिंग क्रीडाप्रकाराचे भवितव्य’ या विषयावर पद्यश्री डॉ. करनाम मल्लेश्वरी बोलणार आहे. मंगळवार 28 रोजी सायं. 5 वा. ‘माझा आत्मा ‘पॅरालाईझ नाही झालाय’या विषयावर पॅराऑलिम्पिक क्रिडास्पर्धेत पदक मिळविणारी पहिली भारतीय महिला पद्यश्री डॉ. दीपा मलिक मार्गदर्शन करणार आहे. बुधवारी 29 रोजी सायं. 5 वा. ‘तळागाळातील असामान्यांचे सबलीकरणः एक सर्वसमावेशक जगाचा प्रवास’ या विषयावर व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी नॉर्दन आर्क कॅपिटलच्या डॉ. क्षमा फर्नाडीस यांचे मार्गदर्शन लाभरणार आहे. तर 30 रोजी साय. 5 वा. ‘जेव्हा महिला राज्य करतील’ या विषयावर एम .बी. ए. शिकलेली पहिली महिला सरपंच, राजस्थानच्या डॉ. छावी. राजावत यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा
हे सर्व वक्ते आपल्या क्षेत्रात अल्लेखनीय असे कार्य करत आहे. त्यांचे मार्गदर्शन आमच्या गोमंतकीय विद्यार्थ्यांना लाभावा या हेतू हा व्याख्यान मालेचा कार्यक्रम प्रत्येक वर्षी होत आहे. राज्यातील सर्व विद्यार्थी या व्याख्यानाचा अस्वाद घ्यावा व स्वताच्या विकासाठी त्याचे मार्गर्शन घ्यावे असे आवाहन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले.









