प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन निवड समितीच्या उपाध्यक्षपदी दुधगाव येथील अविनाश श्रीधर कुदळे यांची निवड पालकमंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नुकतेच त्यांच्या निवडीचे पत्र प्रदान केले.
यापूर्वी कुदळे यांनी या समितीवर सदस्य म्हणून काम केले असून कोरोनाच्या काळात ही 50 ते 60 कलाकारांना मानधन मिळवून दिले आहे. दुधगाव आणि परिसरातील गावांमध्ये रक्तदान शिबिर दुबार आणि नवीन रेशन कार्ड, लायसन्स कॅम्प मोहीम राबवली आहे. दुधगाव ग्रामपंचायतीचे माजी सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले असून समितीचे अध्यक्ष एमजी पाटील तात्या यांचे त्यांना सहकार्य लाभले. त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








