ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारे कलम 370 रद्द झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यातून कोणताही काश्मिरी पंडित आणि हिंदू विस्थापित झालेला नाही. बुधवारी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी यासंदर्भात माहिती दिली.
राष्ट्रीय गुन्हे अभिलेख ब्युरोच्या (एनसीआरबी) आकडेवारीनुसार, कलम 370 रद्द केल्यानंतर काश्मीर खोऱ्यातून काश्मिरी पंडित आणि हिंदू विस्थापित होण्याचा असा कोणताही अहवाल नाही. 5 ऑगस्ट 2019 ते 30 नोव्हेंबर 2021 या काळात 366 दहशतवादी ठार झाले आहेत. 96 नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत, तर 81 सुरक्षा कर्मचारी शहीद झाले आहेत. 2018-2020 दरम्यान झालेल्या दंगलीदरम्यान एकूण 101 जण ठार आणि 3366 जखमी झाले आहेत.









