प्रतिनिधी / तबरेज बागवान
आज केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या विरोधात केलेल्या अन्यायी कायद्याच्या विरोधातात ‘भारत बंद’ ची हाक देण्यात आली होती. याच ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर सातारा येथे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढत कलम 144 चे उल्लंघन केल्याने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती काही काळात या कार्यकर्त्यांची सुटका देखील करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, शिवसेना शहर अध्यख बाळासाहेब शिंदे, नरेंद्र पाटील या कार्यकर्त्यांचा समावेश होता.