ओटवणे /प्रतिनिधी-
सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या “शब्दगंध” या वाचन चळवळीच्या अभिनव व आगळ्या वेगळ्या उपक्रमांतर्गत कलंबिस्त उनयेथील ज्ञानमंदिर वाचनालय आणि कलंबिस्त इंग्लिश स्कुलला मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेतील पुस्तके प्रदान करण्यात आली.
सिंधुमित्र प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्यावतीने विविध शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य व प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. याच उपक्रमांतर्गत सिंधुमित्र प्रतिष्ठानचा शब्दगंध हा नाविन्यपूर्ण गेली पाच वर्षे सुरू आहे. जिल्ह्यातील १८ प्रशालेत सध्या हा उपक्रम सुरू आहे. सध्या टीव्ही, मोबाईल, कॉम्प्युटरच्या या समाजमाध्यमांचा दिवसेंदिवस अतिरेकी वापर सर्वत्र पहावयास मिेळतो. त्यामुळे युवा पिढीचे वाचनाकडे दुर्लक्ष झालेले आहे. यातून मार्ग काढून युवाईला योग्य दिशेने न्यायचे असल्यास वाचन संस्कृतीशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये आणि युवा पिढीमध्ये वाचन चळवळ रुजविण्यासाठी सिंधुमित्र प्रतिष्ठानने शब्दगंध हा आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला.









