ऑनलाईन टीम/तरुण भारत
नवाब मालिकांना पाठिशी घालण्याचे काम शरद पवार आणि मुख्यमंत्री करत आहेत. इतकं कलंक आणि काळिमा फासणारे कृत्य महाराष्ट्रात असू शकत नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली. ते कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत आहे. अडीच वर्षात महाराष्ट्राच्या विकासात आड येण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांची आहे. सरकारबद्दल काय भावना आहेत हे या निवडणुकीत उमटणार आहेत. झालेल्या पोटनिवडणुकीत नेहमीच जनतेने भाजपला आशीर्वाद दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या बाजूने जनादेश आहे. मोदींचे नेतृत्व जनतेला मान्य आहे. असे दरेकर म्हणाले.
राज्याने कोरोनाकाळात एकही रुपयांचे पॅकेज काढले नाही. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहे. आतंकवाद्याची जमीन खरेदी केली जाते. त्यात जे जेलमध्ये आहेत, त्यांना पाठीशी घातले जाते. यांचं लक्ष विकासाकडे न राहता सत्ता टिकवण्यात आहे. असलं सरकार मी कधी पाहिले नाही. देशद्रोही आतंकवादी बॉम्बस्फोटात सहभागी असलेल्या आरोपी असलेल्या लोकांची जमीन नवाब मलिक खरेदी करतात. ते सध्या जेल मध्ये आहेत. राजीनामा आम्ही मागत असताना त्यावर बोलले जात नाही. त्यांना पाठीशी घालण्याचा काम शरद पवार आणि मुख्यमंत्री करत आहेत. इतकं कलंक आणि काळिमा फासणारे कृत्य महाराष्ट्रात असू शकत नाही. असे दरेकर म्हणाले.
पंढरपूर आणि वेंगुर्लेमध्ये शिवसेनेला काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घ्यावा लागला, त्यात कमी म्हणून कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत देखील शिवसेनेने काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेतलेला पाहायला मिळाला. सत्ता टिकवण्यासाठी ही नामुष्की ओढवण्यात आली आहे, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली.
उत्तरच्या शिवसैनिकांचे खच्चीकरण होत आहे. बाळासाहेबांचे हिंदुत्व शिवसेना विसरते, अशी भावना सच्च्या शिवसैनिकांची आहे. त्यामुळे ती नाराजी येत्या काळात दिसून येईल. आणि भाजपच्या उमेदवाराला विजयी करून देतील, असेही दरेकर म्हणाले. आमचा जुना मित्र शिवसेना आहे. म्हणून या भावना शिवसेनेबद्दल आहेत, असेही दरेकर म्हणाले.