वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
संपूर्ण देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे आठवडाभर बिगबास्केट, ग्रोफर्स सारख्या ऑनलाईन सेवा देणारे प्लॅटफॉर्मच्या अडचणीत वाढ झाली आहे. याच दरम्यान बिगबास्केटसह अन्य ऑनलाईन कंपन्यांची पुरवठा यंत्रणा सुरळीत करण्यात कर्मचारी वर्ग नसल्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली असल्याचे कंपन्यांनी सांगितले आहे.
आनलाईन प्लॅटफॉर्मवर लॉकडाउनच्या अगोदरच विविध ग्राहकांनी ऑर्डर दिल्या होत्या. त्या पूर्ण करण्याचे काम सुरु असल्याचे म्हटले आहे. विविध केंद्र आणि स्थानिक अधिकारी वर्गाशी बोलणी केल्यावर आगामी चार ते पाच दिवसांमध्ये ऑनलाईन मालाचा पुरवठा करण्यात येणारी यंत्रणा सुरळीत लागणार असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. परंतु लॉकडाउनमुळे विविध प्रकारच्या समस्या असल्याचेही सांगितले जात आहे.
सध्या कालावधीत ग्रोफर्सजवळ 5 लाख मागणी नोंदवली आहे. यावेळी कंपन्यांनी सांगितले आहे, की आम्ही 100 टक्के क्षमतेने काम करण्यात कमी पडत आहोत. कारण सर्व गोंडावूनसाठी सरकारचा परवाना आवश्यक असून सोबत पुरवठा करण्यासाठीचा पास सोबत असणे आवश्यक असल्याचेही स्पष्टीकरण दिले आहे. आतापर्यंत ग्रोफर्सने आपल्या जवळपास 50 टक्के कर्मचाऱयांना पास मिळाल्याचे सांगितले आहे. यातच लॉकडाउनमुळे मालाचा पुरवठा करणाऱया डिलिव्हरी देणारा कर्मचारी वर्गही घरी गेला आहे.









