प्रतिनिधी / कागल
कागल तालुक्यात उद्या रविवार पासून दहा दिवस जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे . त्याची कागल शहरात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख रस्ते बंद करण्यात येणार आहेत. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्याकरिता शहरवाशियांनी जनता कर्फ्यूला सहकार्य करावे असे आवाहन कागल नगरपरिषदेच्या वतीने आज पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे .
कागल तालुक्यातील कोरोना संसर्गाचा वाढता फैलाव रोखण्याकरिता रविवार पासून दहा दिवस तालुक्यात जनता कर्फ्यू पुकारण्यात आला आहे. कागल शहरात जनता कर्फ्यूची कडक अंमलबाजवणी केली जाईल, असे मुख्याधिकारी पंडित पाटील रमेश माळी यांनी सांगितले.
कर्फ्यूच्या काळात केवळ रूग्णालये, औषध दुकाने, दुध संकलन, शेतीसेवा केंद बँकेची एटीएम, सरकारी, निसरकारी औद्योगिक वसाहती मधील कारखाने सुरू ठेवण्यात येणार आहेत .याठिकाणी कामानिमित्त जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे ओळखपत्र पाहूनच सोडण्यात येईल. तर इतर सर्व प्रकारची दुकाने आणि व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहेत. शहरातील कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आले आहे. जनता कर्फ्यूची जनतेतूनच मागणी केली जात होती. त्यामुळे नागरीकांनी त्याला सहकार्य करावे, दहा दिवस विनाकारण कोणीही घरातून बाहेर पडू नये असे आवाहन मुख्याधिकारी पाटील आणि माळी यांनी केले.
शहरातील सर्वच रस्ते बंद करण्यात येणार आहेत. कर्फ्यूची कडक अंमलबजावणी करण्यासाठी बंदोबसराकरिता अतिरीक्त पोलीसांची मागणी करण्यात आल्याचे नगरसेवक प्रविण काळबर यांनी सांगितले. तरुणांनी विनाकारण दुचाकीवरून फिरू नये, अन्यथा पोलीसांकडून व पालिकेकडून कडक कारवाई करण्यात येईल, असे पक्षप्रतोद नितीन दिंडे यांनी सांगितले . यावेळी नगरसेवक सतिश घाडगे उपस्थित होते.
Previous Articleजम्मू काश्मीरमध्ये दिवसभरात 1251 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
Next Article सातारा जिल्ह्यात 697 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज









