बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य निवडणूक आयोगाने कर्नाटकातील ५७०० पेक्षा जास्त ग्रामपंचायतींसाठी दोन टप्प्यांत मतदान घेण्याचे जाहीर केले आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणुका २२ डिसेंबर रोजी होणार आहेत. यावेळी पहिल्या टप्प्यात २,९३० ग्रामपंचायतींसाठी तर दुसर्या टप्प्यात २७ डिसेंबर रोजी२८३२ ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. दरम्यान ३० डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे.
कोरोना साथीच्या आजारांमुळे निवडणुका तहकूब करण्यास सांगितले होते. निवडणूका घेण्यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. कॉंग्रेसचे नेते के. सी. कोंडैया आणि इतरांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने सरकारवर जोरदार हल्ला चढविला आणि राज्य निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्याचे निर्देश दिले.
राज्य निवडणूक आयुक्त बी. बसवराजू यांनी ५,७६२ ग्रामपंचायतींची मतदान होईल. १६२ ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबर २०२० नंतर संपेल, सहा ज्यांचे निवडणूक खटले कोर्टात आहेत,असे ते म्हणाले.
निवडणुकीसाठी एकूण मतदार संख्या २,९७,१५,०४८ आहे, त्यापैकी १,४९,७१,६७६ पुरुष, १,४७,४१,९६४ महिला आणि १,०४८ तृतीय लिंगी आहेत. निवडणुकांकरिता तयार केलेल्या प्रमाणित कार्यप्रणालीचा भाग म्हणून सर्व मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या १५०० वरून १००० वर कमी झाली आहे.









