बेंगळूर/प्रतिनिधी
२०२३ च्या विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कर्नाटक प्रदेश काँग्रेसने ३ मार्चपासून राज्यभरातील किमान १०० विधानसभा मतदारसंघात ‘जन ध्वनी पदयात्रा’ सुरू करणार आहे.
कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी अधिकृतपणे घोषणा केली की २०१८च्या निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झालेल्या मतदारसंघात ‘पदयात्रा’ काढण्याची योजना आहे.
२०२३ च्या विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या प्रयत्नात पुढील दहा महिन्यांत कॉंग्रेसचे नेते तळागाळातून पक्षाला बळकट करण्यासाठी या मतदारसंघांना भेट देतील.









