बेंगळूरप्रतिनिधी
उच्च शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग यांनी १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांसाठी कोरोना लसीकरण सुरू केले आहे. दरम्यान राज्य सरकारने विद्यार्थी आणि शिक्षकांचे लसीकरण पूर्ण झाल्यांनतर राज्यातील महाविद्यालये सुरु केली जातील असे म्हंटले होते.
राज्य सरकारने कोणताही धोका न पत्करता विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, उच्च शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाने सर्व महाविद्यालये यांना सूचित केले आहे की प्राचार्य लसीकरण नोडल अधिकारी असतील.









