बेंगळूर/प्रतिनिधी
पशुसंवर्धन मंत्री प्रभू चव्हाण यांनी गोहत्याबंदीवर बंदी घालणारे विधेयक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मांडले जाईल असे म्हंटले आहे. ७ डिसेंबरपासून कर्नाटकच्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होणार आहे. या विधेयकाबाबत त्यांनी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांच्याशी बोललो असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे. तसेच रूपरेषा ठरविण्याच्या सूचना विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. इतर राज्यांच्या अशा कायद्यांचा अभ्यास केला जात आहे. कायदे करणार्यांशी सल्लामसलत करून हे विधेयक तयार केले जात आहे.
हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर होईल याची त्यांना खात्री आहे. २०१० मध्येही भाजप सरकारने असे विधेयक मंजूर करून राज्यपालांकडे पाठवले, परंतु तत्कालीन राज्यपाल हंसराज भारद्वाज यांनी राष्ट्रपती भवनाला या विधेयकावर सही करण्यास नकार दिला, असे मंत्री चव्हाण म्हणाले.









