बेंगळूर/प्रतिनिधी
सोमवारी कर्नाटकात कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट झाली. सोमवारी, गेल्या चोवीस तासात राज्यात कोरोना संसर्गाची ६,४९५ नवीन प्रकरणे नोंदली गेली. तर यापैकी राजधानी बेंगळूरमध्ये कोरोनाचे नवीन १८६२ रुग्ण सापडले आहेत. राज्यात सोमवारी ७,२३८ रूग्णांनी कोरोनावर मात केली. यासर्वांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी राज्यात ११३ रुग्णांचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे ८७,२३५ सक्रिय रुग्ण आहेत. तर सोमवारी राज्यात ४३,१३२ चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
सोमवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात सक्रीय रूग्णांची संख्या ३७,११६ वर गेली. सोमवारी २,४२२ रुग्ण बरे झाल्याने रुग्णालयातून घरी परतले. तर नवीन १,८६२ रुग्ण सापडले आहेत. शहरातील कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत १,९६५ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.









