बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात सोमवारी कोरोना रुग्ण संख्येत घट झाली. राज्यात सोमवारी ७,०५१ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर सोमवारी राज्यात ७,०६४ रुग्ण कोरोनावर विजय मिळवत घरी परतले. सोमवारी राज्यात कोरोनामुळे ८४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दरम्यान राजधानी बेंगळूरमध्ये सोमवारी २,१८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली.
आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार राज्यात कोरोनाचे १,१५,४७७ सक्रिय रुग्ण आहेत. तर राज्यात एकूण ६७,३०३ लोकांची तपासणी करण्यात आली.
सोमवारी बेंगळूर शहरी जिल्ह्यात एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ५४,११२ वर पोचली. दरम्यान राजधानीमध्ये सोमवारी २,१८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. तर २,९७२ रुग्ण बरे झाल्याने घरी परतलेत. कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत ३,१०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.









