बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी घट झालेली पाहायला मिळाली. राज्यात सोमवारी १,१५७ कोरोना बाधितांची भर पडली. तसेच २,१८८ रुग्ण बरे झाल्याने रुग्णलयातून घरी परतले. तर १२ जणांचा मृत्यू झालं आहे. दरम्यान राज्यात आतापर्यंत ८,२५,१४१ लोक बरे झाले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९५.३३ टक्के आहे. राज्यात सध्या २६,१०३ रुग्ण उपचार घेत आहेत.
दरम्यान बेंगळूर शहरी जिल्ह्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. सोमवारी जिल्ह्यात कोरोनाचे ५९७ रुग्ण सापडले. तसेच ८३३ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३,५७,८७७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ३,३५,९३८ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या १७,९२९ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आतापर्यंत ४,००९ जणांचा कोरोनाने बळी गेला आहे.









