बेंगळूर/प्रतिनिधी
गुरूवारी झालेल्या कर्नाटक कॉमन एन्ट्रन्स टेस्ट (केसीईटी) २०२० च्या गणिताच्या पेपरला तब्बल ५७ कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांनी उपस्थितीत लावली होती. तर अशा ४९ विद्यार्थ्यांनी बायोलॉजी पेपरला हजेरी लावली होती. सरकारने बाधित विद्यार्थ्यांना केसीईटीला बसण्यास परवानगी दिली होती. परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांसाठी परीक्षाकेंद्रवर वेगळी व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती.
कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जीवशास्त्र विषयाच्या पेपरला ७५.८९ टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती, तर गणित विषयाच्या पेपरसाठी ८९.२२ टक्के विद्यार्थी उपस्थित होते.









