बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनामुळे बंद असणाऱ्या शाळा सुरु करण्यात येत आहेत. अनुसूचीनुसार १ जानेवारी रोजी राज्यात १० वी आणि १२ वी चे वर्ग पुन्हा सुरू होतील, अशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिली आहे.
मंत्री सुरेश यांनी जिल्हा प्रभारी मंत्र्यांना पत्र लिहून तयारीवर लक्ष ठेवण्याची विनंती केली असून मानक कार्यप्रणाली (एसओपी) पाळल्या गेल्या पाहिजेत असे म्हंटले आहे.
शाळा पुन्हा उघडणे आणि मुलांना सतत शिक्षणात गुंतवणे आवश्यक आहे. आम्हाला वर्षभर आपल्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. शाळा पुन्हा सुरू करणे हा एक दिवस किंवा महिन्यापुरता मर्यादित क्रिया नाही, ही वर्षभराची प्रक्रिया आहे, असे मंत्री सुरेश यांनी आपल्या पत्रात म्हंटले आहे.
शाळा सुरक्षा केंद्रे होतील अशी ग्वाही त्यांनी पालकांना दिली. तसेच कोणतीही काळजी न करता ते आपल्या मुलांना पाठवू शकतात.
मानक कार्यकारी कार्यपद्धती (एसओपी) पाळल्या गेल्या पाहिजेत, यासाठी जिल्हा प्रभारी मंत्र्यांनी जिल्हा प्रशासक व जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची विनंती मंत्र्यांनी जिल्हा प्रभारी मंत्र्यांना केली आहे.









