उच्च शिक्षण मंत्र्यांची फ्रान्सच्या कौन्सुलर जनरलने घेतली भेट
बेंगळूर / प्रतिनिधी
बेंगळूरमध्ये फ्रान्सच्या कौन्सुलर जनरलने राज्याच्या उच्च शिक्षण मंत्र्यांची भेट घेउन इंडो-फ्रेंच कॅम्पस इन्स्टिट्यूट स्थापन करण्यास स्वारस्य दाखवले. थियरी बर्थेलॉट यांनी मंत्री डॉ सी. एन. अश्वथ नारायण यांची भेट घेतली आणि बेंगळूर सेंट्रल युनिव्हर्सिटी (BCU) येथे संस्थेच्या स्थापनेबाबत चर्चा केली.
मंत्री डॉ सी. एन. अश्वथ नारायण यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की “फ्रान्स आरोग्य उपक्रमाअंतर्गत अभ्यासक्रम राबवण्यास इच्छुक आहे, ज्यात बायोटेक ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स, औषधे आणि आरोग्य उत्पादने, फार्मास्युटिकल व्यवस्थापन आणि प्रगत फार्मास्युटिकल अभियांत्रिकी यांचा समावेश आहे.”
“इंडस्ट्री ४.० श्रेणी अंतर्गत, ते सायबर सुरक्षा, डेटा विश्लेषण, मशीन लर्निंग इत्यादी अभ्यासक्रम सुरू करण्याची बेंगळूरमध्ये फ्रान्सच्या कौन्सुलर जनरलने अनुकूलता दर्शिवली. इकोलॉजी श्रेणी अंतर्गत, त्यांनी जैवविविधता, हवामान बदल आणि हरित अर्थव्यवस्थेचे अभ्यासक्रम सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली.”तसेच “वरील अभ्यासक्रमांचा अभ्यास करणार्यांना संयुक्त (इंडो-फ्रेंच) पदव्या दिल्या जातील.” सहयोगाअंतर्गत, अभ्यासक्रमाची सामग्री आणि अध्यापनशास्त्र उद्योगाच्या गरजेनुसार संरेखित केले जाईल असे नारायण यांनी पत्रकारांना सांगितले.