बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक कॉंग्रेसचे अध्यक्ष डी. शिवकुमार यांनी मंगळवारी राज्यातील भाजप सरकार आणि माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांच्यावर टीका केली. भाजप सरकार जारकिहोळी यांचे समर्थन करत आहे आणि त्यांच्या पाठीशी उभे असल्याचा आरोप केला. जारकिहोळी यांच्यावर लैंगिक गैरव्यवहाराचा आरोप आहे. या आरोपामुळे राज्यातील राजकारण हदरून गेलं होत.
“शिवकुमार यांनी याविषयी माझे काही म्हणणे नाही, हे काम करणारे आदरणीय माजी मंत्री आहेत, जे तुम्ही सर्वांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, सरकार त्यांचे समर्थन करत आहे. सरकार त्यांच्या मागे का आहे हे मला माहित नाही, शिवकुमार यांनी गुलबर्गा येथील पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं.
त्या महिलेच्या आई-वडिलांनी त्याचे नाव घेतल्यामुळे एसआयटीने त्याला कोणतीही नोटीस बजावली आहे का, असे विचारले असता ते म्हणाले, “का होईल? जरी ते मला कॉल करतात, अगदी स्वागतच आहे, काहीही मला माहित असल्यास मी उत्तर देईन. मी सहकार्य करीन.” असे ते म्हणाले.
लैंगिक व्हिडिओमधील महिलेच्या कुटुंबीयांनी जारकिहोळी यांनी लैंगिक गैरव्यवहार केल्याबद्दल वारंवार दोषारोप केले आणि मुलीचा वापर करून “घाणेरडी राजकारण” केल्याचा आरोप केला.