बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात अंमली पदार्थांचा व्यापार वाढत आहे. राज्यात सुरु असलेला प्राणघातक व्यवसाय आपल्या तरुण पिढीचा नाश करीत आहे. ही समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी राज्य सरकारने प्रभावी पावले उचलली पाहिजेत. राज्यात राजरोसपणे सुरु असलेला हा अमली पदार्थाचा व्यवसाय सरकारने कायम स्वरूपी संपवला पाहिजे असे विधानपरिषदेचे सदस्य भाजपा नेते लेहरसिंग सिरोया यांनी हे आवाहन केले.
मुख्यमंत्री येडियुरापा यांना लिहलेल्या पत्रात सँडलवुडच्या काही कलाकारांचा ड्रॅग प्रकरणात सहभागाबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच राज्यातील शहरातील अनेक शैक्षणिक संस्थांभोवती अमली पदार्थाचा गैरवापर होणे चिंताजनक आहे.
राज्यात सुरु असलेल्या या व्यवसायाला आळा घालण्यासाठी व्यापक कायद्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे कारण विद्यमान कायद्यातील तरतुदी पुरेशा नाहीत. कायद्यात असा बदल झाला पाहिजे की ड्रॅग विक्रेत्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे, असे त्यांनी म्हंटले आहे.









