राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठीं प्रशासकीय यंत्रणेबरोबर डॉकटर्स, सरकारी कर्मचारी, अशा सेविका स्वच्छता कामगार यासह अन्य क्षेत्रातील कर्मचारी मेहनत घेत आहेत. यामध्ये शासकीय रूग्णालयात कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या एमबीबीएस डॉक्टरांच्या पगारामध्ये 15,000 ची वाढ करण्याचे आदेश राज्यसरकारने दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे तब्बल 507 डॉक्टरांना याचा फायदा होणार आहे. कंत्राटी डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी काम बंद केले होते. यांनतर त्यांच्या मागण्यांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या नियंत्रणाखाली कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टरांचा पगार दरमहा 45 हजार ते 60 हजार रु. आहे. कंत्राटी डॉक्टरांनी त्यांची सेवा कायमस्वरुपी सुरु ठेवावी यासाठी हे पाऊल उचलण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाने म्हंटले आहे. गुरुवारी कर्नाटकचे आरोग्यमंत्री बी. श्रीरामुलू यांनी कंत्राटी डॉक्टरांच्या मागण्यांवर भाष्य करताना त्यांनी मागण्यांचा विचार केला जाईल पण कंत्राटी डॉक्टरांनी आपली सेवा नियमित सुरु ठेवावी आवाहन केले.
“यावेळी मंत्री श्रीरामुलू यांनी कंत्राटी डॉक्टरांना हात जोडून काम सुरु ठेवण्यास विनंती केली. कंत्राटी डॉक्टरांनी केलेल्या मागण्यांमध्ये एक पगारवाढ आणि सेवेत कायमस्वरूपी सामावून घेणे. या विषयी बोलताना श्रीरामुलू यांनी त्यांच्या मागण्या मान्य करण्याची हमी देऊन त्यांच्या पाठीशी कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









