बंगळूर / प्रतिनिधी
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णालयात उपचारांसाठी बेड शोधणे खूप अवघड होत आहे, अशा वेळी कर्नाटक सरकारच्या नव्या आदेशाने वादाला तोंड फोडले आहे. बंगळुरुमधील डिलक्स सरकारी गेस्ट हाऊस मंत्री, आमदार, खासदार आणि उच्च सरकारी अधिकाऱ्यांसाठी कोविड केअर सेंटर म्हणून १०० खोल्या आरक्षित केल्या आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार मंत्री, संसद सदस्य, विधानसभेचे सदस्य आणि सचिव पदाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसाठी कुमार कृपा गेस्टहाऊसच्या शाखेत कक्ष निश्चित करण्यात आले आहेत. या आदेशाने असे प्रश्न उपस्थित केले आहेत की राज्य सरकार सामान्य लोकांपेक्षा व्हीआयपींवर उपचार करणे पसंत करत आहे.
सरकारने काढलेल्या आदेशात नमूद केले आहे की लोकनियुक्त प्रतिनिधी आणि मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी यांना कर्तव्याच्या वेळी कोरोना विषाणूची लागण होत आहे आणि त्यांना सुविधा असलेल्या कोविड केअर सेंटरची आवश्यकता आहे. व्हीव्हीआयपी गेस्ट हाऊसची उपलब्धता आणि कमी गर्दी याची खात्री करण्यासाठी उर्वरित इमारतीत बुकिंगची संख्या 33, 33 टक्के क्षमतेपर्यंत मर्यादित ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यासह व्यवस्थापनाला सर्व अनावश्यक पाहुण्यांना टाळण्याचेही सांगितले आहे.