बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक सरकारने कोविड -१९ लॉकडाऊन दरम्यान असंगठित क्षेत्रातील शेतकरी, वाहन व कॅब चालक, बांधकाम कामगार, कलाकार आणि विविध कामगारांना १,२५० कोटी रुपयांचे कोविड -१९ मदत पॅकेज जाहीर केले. दरम्यान, विरोधी पक्षांकडून वारंवार पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली जात होती. आज मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या बैठकीत या विशेष पॅकेजची घोषणा केली.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी बुधवारी वरिष्ठ अधिकारी आणि कॅबिनेट मंत्री यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी विशेष मदत पॅकेजेची घोषणा केली. सरकारकडून मदत पॅकेज जाहीर करण्यासाठी विरोधी पक्षांकडून दबाव होता.









